Breaking News
निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता राखणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं ध्येय असतं. आपल्याला हे लक्षात ठेवून योग्य वेळी आणि योग्य मार्गाने आपल्या निधीचे नियोजन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने SIP आणि SWP ही दोन महत्त्वाची साधनं आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण निवृत्तीसाठी प्रभावी नियोजन करू शकतो.
SIP म्हणजे काय?
हा एक नियमित आणि पद्धतशीर गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे, ज्यामध्ये आपल्याला दरमहा ठराविक रक्कम गुंतवायची असते. आपण विविध म्युच्युअल फंडांमध्ये च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. या पद्धतीला सुरुवात केली की आपल्याला मोठ्या रकमेशिवायही गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात. SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही बाजारातील चढ-उतारांपासून बचाव करता आणि दीर्घकालीन परतावा मिळवता.
SIP च्या उदाहरणाद्वारे निवृत्तीसाठी नियोजन
समजा, तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 20,000 रुपये मध्ये गुंतवत आहात. गृहीतक म्हणून आपण दरवष 12% चा परतावा घेत आहोत. या परताव्याच्या आधारावर 20 वर्षांत तुम्ही एक मोठा निधी जमा करू शकता.
20,000 रुपये SIP चा एक साधारण गणित असा आहे:
दरमहा गुंतवणूक: 20,000 रुपये
गुंतवणुकीचा कालावधी: 20 वर्षे
वाढीचा दर: 12% प्रति वर्ष
साधारणतः 20 वर्षांच्या कालावधीत 20,000 रुपये मध्ये 12% परताव्याने तुमची एकूण गुंतवणूक रु. 1.84 कोटीपर्यंत वाढू शकते. यामध्ये मुख्यतः गुंतवणुकीच्या रकमेच्या व्रद्धीचा फायदा होत असतो, ज्यामुळे एक मोठा निधी तयार होतो.
SWP म्हणजे काय?
SWP म्हणजे एक अशी पद्धत, ज्यात आपल्याला गुंतवलेल्या रकमेतील काही भाग निश्चित कालावधीनंतर नियमितपणे काढता येतो. यामुळे आपल्याला निवृत्तीनंतर दरमहा नियमित उत्पन्न मिळवता येते, आणि आपले संचित संपत्तीही सुरक्षित राहते. डथझ चा वापर करून, तुम्ही च्या माध्यमातून जमा केलेल्या निधीवरून दरमहा रक्कम काढू शकता.
SWP च्या माध्यमातून निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न
समजा, तुम्ही 1.84 कोटी रुपये एकत्र केले आहेत, आणि आता तुम्ही SWP वापरून दरमहा 1.5 लाख रुपये काढू इच्छिता. यामुळे, तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा एक स्थिर आणि नियमित उत्पन्न मिळेल. यामुळे, तुमच्या आर्थिक गरजा आरामात भागवता येतात.
याचप्रमाणे, तुम्ही निधीचे योग्य व्यवस्थापन करत, SWP च्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवू शकता. या रकमेच्या काढणीनंतर तुमच्या संपत्तीचा एक भाग सुरक्षित ठेवला जातो, ज्यामुळे लांब मुदतीसाठी तुमचा निधी सुरक्षित राहतो.
SIP आणि SWP चा संयोग
SIP आणि SWP चा संयोग आपल्याला सर्वात उत्तम फायदे देऊ शकतो. SWP च्या माध्यमातून तुम्ही नियमित गुंतवणूक करत असता आणि त्यावर मिळणाऱ्या परताव्यामुळे तुम्ही मोठा निधी तयार करता. त्यानंतर, SIP च्या माध्यमातून तुम्ही त्या निधीवरून नियमित रक्कम काढून आर्थिक स्थिरता मिळवू शकता.
SIP आणि SWP हे दोन शक्तिशाली वित्तीय साधनं आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण दीर्घकालीन आणि निवृत्तीनंतरचा स्थिर आर्थिक आधार तयार करू शकतो. SIP च्या मदतीने लहान रकमेची नियमित गुंतवणूक मोठ्या रकमेत रूपांतरित करता येते, आणि SWP च्या माध्यमातून त्या रकमेतून स्थिर उत्पन्न मिळवता येते. म्हणूनच, योग्य वेळेत SIP मध्ये गुंतवणूक करा आणि निवृत्तीनंतर आरामदायक जीवनासाठी SWP ची योजना तयार करा.म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीची किंमत बाजाराच्या स्थितीनुसार वाढू किंवा कमी होऊ शकते.
-सुशांत पटनाईक , (नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक) प्रोप्रायटर- रिलायबल इनवेस्टमेंट
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai