Breaking News
नवी मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 एप्रिल ते 6 जून या कालावधीत या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा संपत आल्या आहेत. त्यानुसार अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे या काळाळ नियोजित मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात उधना जंक्शन-मंगळुरू जंक्शन (09057) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी चालविली जाणार आहे. ही गाडी 7 एप्रिल ते 5 जून या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री 8 वाजता सुटेल, तर दुसऱ्या दिवशी सांयकाळी 7 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन-उधना जंक्शन (09058) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी 8 एप्रिल ते 6 जून यादरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चालविली जाणार आहे. ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव या स्थानकांवर थांबेल. विशेष म्हणजे ही गाडी 23 डब्ब्यांची असून, त्यात तीन वातानुकूलित कोच असणार आहेत, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai