Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम विरोधात मोहीम तीव्र करण्यात आलेली असून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली विभागांत 6 बांधकांमावर तोडक कारवाई करण्यात आली.
पालिकेने संबंधित अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवली होती. मात्र संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई पालिका अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. यामध्ये नेरूळ विभागात घर क्र. 207/208 लोट्स अपा. नेरूळ येथील बांधकाम हटविण्यात आलेले आहे. तसेच कोपरखैरणे विभागात सेक्टर 4 कोपरखैरणे येथे रूम नं. 994 येथील अनधिकृत वाढीव बांधकाम तसेच रूम नं. 993 येथील अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासित करण्यात आले. घणसोली विभागातील दोन अनधिकृत बांधकामवर कारवाईचा हातोडा पडला. ऐरोली विभागातही सेक्टर 2 येथे केलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अमोल पालवे व अभियंता राजू हळंदे तसेच कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल काठोळे व अभियंता श्री. सचिन नामवाड, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय तायडे व अभियंता रोहित ठाकरे, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक अहिरे व कनिष्ठ अभियंता श्री.राज नागरगोजे यांच्या उपस्थितीत या तोडक कारवाया करण्यात आल्या. या मोहीमेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रविवारी एकाच दिवसात विविध विभागांमध्ये केलेल्या 8 अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाईनंतर आजही 6 अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आलेली असून यापुढील काळात कारवाया तीव्रतेने राबविण्यात येणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai