Breaking News
नवी मुंबई ः खारफुटीच्या पर्यावरणशील संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजी जगभरात साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ऐरोली सेक्टर 10 येथील खाडीकिनारी विद्यार्थी व नागरिकांच्या सहयोगातून खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाकरिता खाडीकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विस्तृत असा खाडीकिनारा लाभला असून त्याची स्वच्छता रहावी व त्याचा उपयोग खाडीकिनाऱ्यांच्या पर्यावरण संरक्षणाला व्हावा या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह वनशक्ती स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख विकी पाटील व त्यांचे सहकारी तसेच घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
या खाडीकिनाऱ्याच्या विशेष स्वच्छता मोहीमेत 60 गोणी प्लास्टिक बाटल्या, प्रतिबंधात्मक प्लास्टिक, चपला तसेच तत्सम कचरा गोळा करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे खारफुटी जतन व संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai