Breaking News
नवी मुंबई : बेलापुरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु केल्यानंतर आ. संदीप नाईक हे बेलापुर मतदारसंघात सक्रिय झाले असून नेरुळ, वाशी, सानपाडा नोडमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचा सपाटा लावला आहे. तेथील नागरिकांशी संवाद साधून ज्येष्ठ नागरिक , कतृत्ववान महिला, विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात येत आहे. यातील सर्व नोड मध्ये राबवलेल्या ‘ज्येष्ठ नागरिकांशी संवाद व सन्मान' या उपक्रमाची सांगता सानपाडा येथे नुकतीच करण्यात आली.
देशभरात नवी मुंबईची घोडदौड आणि नावलौकिक आहे ज्यामध्ये ज्येष्ठांचा हातभार आहे. अशा घटकाचा सन्मान व्हावा या उद्देशाने नवी मुंबई मधील विविध नोड मधील ‘ज्येष्ठ नागरिकांशी संवाद' साधून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम संदीप नाईक यांनी हाती घेतला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा जेष्ठ नागरिकांप्रती आदर व सन्मानाच्या भावनेचा संदेश पसरवणे आहे. नवी मुंबई भाजपा व संदीप नाईक प्रतिष्ठानच्यावतीने वाशीत मंगळवार दि. 30 जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परिसरातील ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. वाशी प्रभाग क्रमांक 62 मधील म्हणजे सेक्टर 15, 16 व 16ए मधील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम सेक्टर 15 मधील गुजरात भवन येथे पार पडला. यावेळी ‘एक पेड मा के नाम' या अभियानांतर्गत वृक्ष रोपांचे वाटप नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच 31 जुलै रोजी सानपाडा मध्ये या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक 74, 75, 76 आणि 79 मधील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई भाजप जिल्हा ग्राम व पंचायत राज संयोजक भाऊ जी भापकर, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा अध्यक्ष सुनीलजी कुरकुटे, समाजसेविका शैला पाटील, शिल्पा ठाकूर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai