Breaking News
नवी मुंबई : आपल्या देशाचा विकास साधायचा असेल देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर सामाजिक ऐक्य असले पाहिजे. देशाच्या पहिल्या सामाजिक परिषदेत समानतेचा विचार मांडताना समान संधी व समान न्याय मिळणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दि मंगेश आमले इनिशेटिव्ह यांच्या वतीने आयोजित रविवारी वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित सर्व जाती धर्मातील नागरिकांसमोर मार्गदर्शन केले. एकसंघ समाज आणि एक संघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन काम करण्याची गरज आहे. नेहमीच एकत्र असलेल्या या समाजात संघर्ष झाला हे चित्र बदलण्याची गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सामाजिक ऐक्य हवे असे शरद पवार यांनी सांगितले. महिलांना सुद्धा संधी मिळावी याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की कर्तुत्वाचा मक्ता हा ठराविक लोकांकडे नसतो. तर तो महिला आणि पुरुष दोघांकडेही असतो. कर्तृत्व दाखविण्यासाठी स्त्रियांनाही संधी द्यायला हवी अशी संधी मिळालेल्या स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. स्त्रिया आपले काम पूर्ण क्षमतेने पूर्ण करतात, सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करतात त्यामुळे त्यातल्या त्रुटी कमी होतात. समाजात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाव्यात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
“आपल्या देशात जर समानता नांदायला हवी तर आजची परिस्थिती ज्या प्रकारे अत्यंत विदारक झाली त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्याकरिता जात-पात धर्मभाषा यातील असणारे अंतर कमी झाले पाहिजे. एक संघ समाजाने एक संघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे त्यासाठी सामाजिक ऐक्य परिषदेची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात नव्हे तर देशात ठिकठिकाणी अशा प्रकारची सामाजिक न्याय परिषद आयोजित होणे गरजेचे आहे.“ असे ही त्यांनी यावेळी सांगितले. सिडको सभागृहात यावेळी हजारोंच्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व विविध जाती धर्मातील व विविध पक्षातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपल्या भाषणातून समाज जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत समाज ओळखला जात नाही. आजच्या या युगात सुद्धा आपल्याला सामाजिक ऐक्य परिषद घ्यावी लागते याची खंत वाटते असे सांगितले. आमदार रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला नसता तर आज शिक्षण क्षेत्रात महिला पुढे आल्या नसत्या. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत हे फक्त त्यांनी त्यावेळी घेतलेल्या परिश्रमामुळेच होय. यावेळी शशिकांत शिंदे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून सामाजिक ऐक्य किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. या ऐक्य परिषदेत विविध मान्यवरांनी आपले सामाजिक ऐक्याबद्दल मत प्रगट केलेत. यावेळी विकास लवांडे, विनोद पोखरकर, विठ्ठल मोरे, चंद्रकांत पाटील, अनिल कौशिक, अफसर इमाम व इतर मान्यवरांची भाषणे झालीत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai