Breaking News
साई भक्त महिला मंडळाला प्रथम पारितोषिक
नवी मुंबई : आमदार मंदा म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेने आयोजिलेल्या मंगळागौरीचा कार्यक्रमात तरुणींपासून वयोवृद्ध महिलापर्यंत साऱ्यांनीच देहभान विसरून आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई लोकल ट्रेन सेन्सेशन ब्रँड एम्बेसेडर पूजा रेखा शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली.
रविवारी सकाळी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह मंगळागौरीच्या खेळांनी बहरुन गेले होते. यात कुणी गृहिणी होत्या, कुणी अभियंता, कुणी शिक्षक, कुणी प्राचार्या, कुणी बचतगट संचालिका, तर कुणी वेलनेस गुरू. यामुळे कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या महिलांसह उपस्थित महिला, प्रमुख पाहुण्यांनी आयोजक आमदार मंदा म्हात्रे यांचे कौतुक करून मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटला. त्याचबरोबर सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र लावणी सम्राट नवी मुंबई भूषण व बालगंधर्व पुरस्कार विजेते अशिमिक कामठे या यांनी चारचांद लावले. तसेच कार्यक्रमाची सुरुवातच महिलांच्या मोठ्या समूहाने केलेल्या दीपप्रज्वलनाने केली. हे दृश्य मोठे मनमोहक दिसले. यानंतर महिलांच्या एकेक गटाने आपले खेळ सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यात पारंपरिक वेशातील महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. आपले वय, आपण करीत असलेले काम, सारे विसरून सहभागी महिलांनी देहभान विसरून कार्यक्रमाचा आनंद लुटला. या प्रसंगी महिला व्यासपीठावर मंगळागौरीचे खेळ, गाणी सादर करीत असताना सभागृहात उपस्थित महिलांनी नाचगाण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांच्या आग्रहास्तव आमदार मंदा म्हात्रे यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपरिक गायन व विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या प्रथम परितोषिक 5001 रुपये साई भक्त महिला मंडळ (सानपाडा), द्वितीय पारितोषिक 3001 रुपये नूतन महिला मंडळ (सीबीडी)दुसरे, तर तृतीय पारितोषिक रू. 2001 रुपये स्वामिनी महिला मंडळ (वाशी) व उत्तेजनार्थ पारितोषिक रू. 1001, म्हणून गोरबंद राजस्थानी मंडळ (वाशी) यांना देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून नशीबवान महिला विजेत्या नंदा पवार (नेरुळ पच्छिम), दर्शना गावडे (सीवूडस), हिराबाई चव्हाण (वाशी), वैशाली सकपाळ (सीवूडस) यांना सुबकदार नथ तसेच सुनीता शिंदे (सानपाडा), देवयानी मुकादम (सीबीडी), ममता गोस्वामी (वाशी), रेणुका बागुल (सीवूडस), कांतिदेवी चौधरी (सीबीडी), स्नेहल राहटे (सीबीडी), जयश्री शेवते (सानपाडा), यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai