Breaking News
80% स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी
नवी मुंबई : महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80% नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या यासाठी नवी मुंबई मनसेने 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान रोजगार हक्क सप्ताह सुरू केला आहे. यामध्ये मनसे सही मोहिम, घरोघरी पत्रक वाटप, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी विविध आस्थआपनांना व कंपन्यांना निवेदन देणार आहे. तसेच सरकारने 80% स्थानिकांना नोकऱ्या देण्यास कंपन्यांना भाग पाडावे नाहीतर उद्योगमंत्र्यांचे पुतळे जाळण्याचा इशाराही दिला आहे.
रोजगार हक्क सप्ताहाची माहिती देण्यासाठी मनसेने नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की, या सप्ताहात नवी मुंबईतील विविध चौकात, विविध रेल्वे स्थानकाच्या बाहेर सही मोहीम राबवून मनसेच्या या चळवळीस पाठिंबा देण्याची विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नवी मुंबईकरांना पत्रके वाटून या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करणार आहेत अशी माहिती काळे यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80% नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, असा शासन निर्णय असताना सुद्धा सरकारी यंत्रणा याची अंमलबजावणी करत नाही. सरकारी यंत्रणांच्या अशा कामचुकार वागणुकीमुळे करोडो स्थानिक मराठी तरुणांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात नवी मुंबई मनसेने गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाला पत्र देण्यात आले. अधिकाऱ्यांची उदासीनता पाहून मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. त्याचप्रमाणे मनसे येत्या काही दिवसात या विषयाशी संबंधित सर्व सरकारी आस्थपणांना निवेदन देणार आहे. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक थोड्याच दिवसात विविध कंपन्यांना पत्र देऊन 80 टक्के स्थानिक मराठी मुलांना नोकऱ्या द्या अशी मागणी करणार आहेत. या सोबत बेरोजगार युवकांची नोंदणी करून, त्यांचे बायोडाटा गोळा करून कंपन्यांना जाऊन हे बायोडाटा देण्यात येतील.
नवी मुंबईतील बेरोजगारी संपुष्टात यावी व इथे निर्माण होणारे रोजगार स्थानिक तरुणांना मिळावे, यासाठी मनसे आग्रही आहे. यासाठी सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाने तात्काळ सर्व कंपन्यांशी संलग्न नोंदणी करून या कंपन्यांना 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यास भाग पाडावे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत व मंगलप्रभात लोढा यांचे पुतळे जाळू असा इशारा गजानन काळे यांनी दिला. या पत्रकार परिषदेत गजानन काळे यांच्या सह सविनय म्हात्रे, विल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai