Breaking News
दशरथ भगत यांची पालिकेकडे मागणी
नवी मुंबई ः सायन-पनवेल महामार्गाखालील सिडकोकालीन बांधलेल्या वाशीगाव येथील स्व. प्रेमनाथ पाटील चौक ते वाशी सेक्टर 6-7 ला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. येथील समस्या तातडीने सोडवून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी दशरथ भगत यांनी केली आहे.
वाशीगावाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. येथील साईड पट्टी लगतच्या पाणी वाहून नेणाऱ्या नालीवरील झाकणे निखळ्याने वाहनांने टायर त्यात अडकून किरकोळ अपघात होऊन वाहतुक कोंडी होत आहे. छतातुन पाण्याची गळती होत असल्याने भुयारी मार्गात पाणी साचत आहे. तसेच काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे सूचित केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व वाशीगाव ग्रामस्थ नागरिकांसमवेत पालिकेचे वाशी विभागाचे स्थापत्य विभागाचे उपअभियंता किरण पाटील यांनी आज या भुयारी मार्गातील विविध समस्यांची पाहणी केली. यावेळी सदर भुयारी मार्गातील छताची गळती, मार्गातील खड्डे व अन्य आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करावीत नागरिकांना, प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी दशरथ भगत यांनी केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai