Breaking News
नवी मुंबई ः सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुक वळवण्यासाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्च करुन सानपाडा येथे उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. हा पुल महारेल कॉर्पोरेशनने बांधला आहे. पहिल्याच पावसात या उड्डाणपुलावरील डांबर वाहुन गेल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र सरकारने सायन-पनवेल महामार्ग सहा पदरी करण्याचा काम 2008 ते 2014 या कार्यकाळात हाती घेतले होते. या महामार्गावर नव्वदच्या दशकात उत्तर प्रदेश कंस्ट्रक्शन कंपनीकडून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला अल्पावधीतच ठिकठिकाणी भेगा पडल्या होत्या. या पुलाची डागडुजी करुन तो आतापर्यंत वापरण्यात आला. पण भविष्यातील धोका ओळखून महाराष्ट्र शासनाने हा पुल नव्याने बांधण्याचे ठरवून चालु वाहतुक दुसऱ्या मार्गाने वळवण्यासाठी नवीन पुलाचे बांधकाम हाती घेतले.
महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून सानपाडा येथून मुंबईला जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम 2020 साली हाती घेण्यात आले. या उड्डाणपुलाचे काम पुर्ण होवून 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि जुन्या पुलाचे तोडकाम सुरु करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात या उड्डाणपुलावरील डांबर वाहुन गेल्याने सर आली धावून डांबर गेले वाहून अशी उपरोधिक टिका वाहनचालक करत आहेत. पहिल्याच पावसात डांबर वाहुन गेल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai