Breaking News
नवी मुंबई : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत कोकण विभागात शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी आत्तापर्यंत एकूण 5 हजार 384 उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत एकूण 4 हजार 76 उमेदवार शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभागाचे उपायुक्त, दिलीप पवार यांनी दिली आहे.
राज्यभर यशस्वी झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्ष लाभ राज्यातील माता, भगिणी, मुलींच्या खात्यात जमा झाल्या नंतर लाडक्या भावाचे काय असा प्रश्न जनसामान्यांमधून विचारण्यात येत होता. म्हणून लाडक्या बहिणीबरोबर लाडक्या भावालाही आर्थिक पाठबळ मिळावे अशा उद्देशाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गतआतापर्यंत शासकीय आणि खाजगी आस्थापनांवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने एकूण 22 हजार 767 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी शासकीय आस्थापनांवर ऑनलाईन पद्धतीने 725 व ऑफलाइन पद्धतीने 2 हजार 345तर खाजगी आस्थापनांवर ऑनलाईन पद्धतीने 660 तर ऑफलाईन पद्धतीने 349 असे एकूण 4 हजार 76 उमेदवार प्रत्यक्षरित्या प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.
सर्वप्रथम शासकीय आस्थापना आणि खासगी उद्योजकांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणी करण्यात आली असून कोकण विभागातील मुंबई शहरांतर्गत येणाऱ्या शासकीय आणि खासगी अशा 104 आस्थापना/उद्योजकांनी, मुंबई उपनगरमधील 90, ठाणे 600, पालघर 624, रायगड 104, रत्नागिरी 185, सिंधुदूर्ग 494 अशा एकूण 2 हजार 201 शासकीय आणि खासगी आस्थापना/उद्योजकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणी केली आहे. या नोंदणी झालेल्या शासकीय आस्थापनांमध्ये एकूण 82 हजार 931 रिक्त पदे आहेत तर खासगी आस्थापनांमध्ये एकूण 10 हजार 189 पदे रिक्त आहेत. त्यापैकी मुंबई शहर जिल्ह्यात शासकीय 51 हजार 435 खाजगी 440 एकूण 52 हजार 09, मुंबई उपनगर जिल्हयात शासकीय 467 खासगी 2 हजार 378 एकूण 3 हजार 137, ठाणे जिल्हयात शासकीय 5 हजार 137 खासगी 2 हजार 717 एकूण 8 हजार 805, पालघर जिल्ह्यात शासकीय 3 हजार 111 खासगी 2 हजार 88 एकूण 5 हजार 540, रायगड जिल्ह्यात शासकीय 6 हजार 102 खासगी 1 हजार 855 एकूण 7 हजार 957, रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय 626 खासगी 388 एकूण 3 हजार 375, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय 1 हजार 785 खासगी 323 एकूण 2 हजार 108 अशा प्रकारे रिक्त पदांची ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने नोंदणी झाली आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत अजूनही कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. याबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी प्रसिद्धी व्हावी यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ही योजना शहरापासून गाव पातळीपर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी गाव खेड्यांमधील मुलांना मुलींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या योजनेच्या जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहनकौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभागाचे उपायुक्त दिलीप पवार यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai