Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबईतील सिडकोच्या भूखंडांवर बांधकाम मुदतवाढीकरिता देय असलेल्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क वसुलीबाबत राबविण्यात आलेल्या अभय योजनेस महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबई व परिसरातील सिडकोने भाडेपट्ट्याने वितरीत केलेल्या जमिनींच्या विकासनाच्या अनुषंगाने वांधकाम व्यवसायाशी संबंधित अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 12 जानेवारी 2024 रोजीच्या आदेशान्वये सिडकोने बांधकाम मुदतवाढीकरिता देय असलेल्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क वसुलीबाबत अभय योजना राबविण्यास तसेच इतर लोकाभिमुख धोरणात्मक निर्णय घेऊन मान्यता दिली होती. सदर अभय योजनेस महाराष्ट्र शासनाने 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
सदर अभय योजनेस देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार, नवी मुंबई क्षेत्र तसेच नवीन शहरे प्रकल्पांतर्गत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड व नागपूर येथील सिडकोच्या प्रकल्पांसाठी अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क तसेच सेवा शुल्क व विकास शुल्क मध्ये 50% सवलत देण्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेंतर्गत अर्जदारास अर्ज करण्याकरिता 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अभय योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्ज/निवेदनांवर प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून पुढील 15 दिवसांत नियमोचित तपासणी करून, सिडकोमार्फत संबंधितांना रकमेचा भरणा करणेबाबत कळविण्यात येईल. सिडकोकडून याबाबत कळविण्यात आल्यानंतर पुढील 15 दिवसांच्या आत अर्जदाराने रकमेचा भरणा करणे आवश्यक असणार आहे.
ज्या अर्जांवर भूखंडाचा क्रमांक नमूद केलेला असेल तेच अर्ज परिपूर्ण समजण्यात येतील. तसेच 15 सप्टेंबर 2024 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा अभय योजने अंतर्गत विचार केला जाणार नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai