Breaking News
212 जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय
नवी मुंबई ः प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार व पदोन्नती निवड समितीने 12 संवर्गातील 85 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती व 19 संवर्गातील 212 अधिकारी, कर्मचारी यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार लवकरच या अधिकारी, कर्मचारी यांना तशा प्रकारचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. विशेषत्वाने यामध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात आलेला आहे.
पदोन्नतीमध्ये अधिक्षक/वसुली अधिकारी संवर्गात 20, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गात 2, उपअभियंता (स्थापत्य) संवर्गात 11, सहा. अग्निशमन अधिकारी संवर्गात 4, अग्निशमन प्रणेता संवर्गात 6, ड्रायव्हर ऑपरेटर संवर्गात 30, लेखाधिकारी / लेखा परीक्षा अधिकारी संवर्गात 2, उद्यान अधिक्षक संवर्गात 2, सहा.लेखा अधिकारी / सहा. लेखा परीक्षा अधिकारी संवर्गात 1, लेखा लिपिक संवर्गात 2, उपअभियंता (विद्युत) संवर्गात 4, उप अभियंता (यांत्रिकी) संवर्गात 2 अशाप्रकारे एकूण 86 अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 19 संवर्गातील 212 अधिकारी, कर्मचारी यांना लागू करण्यात आली असून त्यामध्ये 1 अधिक्षक, 1 दूरध्वनी चालक, 1 सफाई कामगार कम क्लिनर, 8 सफाई कामगार, 13 शिपाई, 2 मदतनीस / सहा.प्लंबर, 12 उपअभियंता (स्थापत्य), 25 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 3 उपलेखापाल / लेखा परीक्षक, 2 शल्यचिकित्सक, 3 सार्वजनिक आरोग्य परिचारिका, 7 सिस्टर इन्चार्ज / नाईट सुपरवाईझर, 13 आरोग्य सहाय्यक (महिला), 21 आरोग्य सहाय्यक, 10 स्टाफ नर्स, 79 ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, 1 दंत शल्याचिकित्सक, 9 माळी / बहुउद्देशीय सेवक, 1 कक्षसेवक अशाप्रकारे एकूण 212 अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीवृंदाला सेवांतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन विभाग गतीशील काम करीत असून यामुळे नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदामार्फत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दैनंदिन कामकाजावर होणार असून नागरिकांना उत्तम सेवा सुविधा पूर्ततेसाठी ही बाब उपयोगी ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai