Breaking News
80 कोटींच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई ः दोन वर्षांपुर्वी नवी मुंबईत 80 कोटी रुपये खर्च करुन विद्यूत पथदिवे बदलण्यात आले होते. या पावसाळ्यात फांदी तुटायला आणि पोल पडायला एकच गाठ पडल्याने पोलच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित कामाची व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नवी मुंबई सजग नागरिक मंचने केली आहे.
2022 ते 2023 या कार्यकाळात नवी मुंबईतील विद्युत पथदिवे बदलण्याचे काम नवी मुंबई महापालिकेने हाती घेतले होते. या कामावर सूमारे 80 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या कामात जुने पोल संबंधित ठेकेदाराने घेऊन जाण्याची अट ठेवण्यात आली होती. दोन प्रकारच्या उंची असलेले पोल संपुर्ण शहरात लावण्यात आले आहेत. (पान 7 वर)
या पोलवर एलईडी दिवे लावण्यात आल्याने पालिकेच्या वीज बिलात वार्षिक चार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. चार कोटी रुपयांच्या बचतीसाठी 80 कोटी रुपये खर्च करणे हा आतबट्याचा व्यवहार त्यावेळी पालिकेच्या विद्युत विभागाने तत्कालीन आयुक्त व प्रशासक अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात केला होता.
या पोलच्या कामाच्या दर्जाची पोलखोल या पावसाळ्यात झाली असून फांदी पडल्याने संपुर्ण पोल मुळासकट तुटून पडला आहे. सुदैवाने कोणतीही जिवित वा वित्तीयहानी न झाल्याने विद्युत विभागाने सूस्कारा सोडला आहे. दरम्यान, या कामाच्या दर्जाबाबत नवी मुंबई सजग नागरिक मंचने प्रश्न उपस्थित करुन संपुर्ण कामाच्या दर्जाचे अवलोकन करण्याचे तसेच तृतीय पक्षाकडून त्याची चाचणी करण्याची मागणी केली आहे. कामाचा दर्जा असमाधानकारक आढळल्यास पालिकेच्या नुकसानीस संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचीही मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष सुधीर दाणी यांनी केल्याने पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलच्या दर्जाबाबत यापुर्वीच तपासणी अहवाल विभागाने घेतले आहेत. झाड पडल्यामुळे विदयुत खांब पडल्याचे विभागाने कळवले आहे. तरीपण पुन्हा एकदा विद्युत पोलच्या कामाच्या दर्जाबाबत तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल. - शिरीष आरदवाड, शहर अभियंता
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai