Breaking News
आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आवाहन; कापडी पिशव्यांचे वाटप
नवी मुंबई ः नवी मुंबई प्लास्टीक मुक्त करण्यासाठी पालिका, सामाजिक संस्थांकडून सतत विशेष मोहीम राबविण्यात येत असतात. आता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई प्लास्टीक मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरा आणि पर्यावरण संरक्षक व्हा. प्लास्टिकला नकार देऊया, स्वच्छ कापडी पिशवीचा स्विकार करून प्लास्टिकमुक्त नवी मुंबईच्या निश्चयामध्ये सामील व्हा असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले.
नवी मुंबई प्लास्टीक मुक्त करण्याच्या अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जुईनगर-सानपाडा विभागातील महीलांना राजेश पाटील व काशिनाथ पाटील यांच्या पुढाकाराने व स्नेहालय महिला मंडळाच्या असंख्य महीलांच्या उपस्थितीत कापडी पिशव्यांचे वाटप केले. यावेळी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरा आणि पर्यावरण संरक्षक व्हा. प्लास्टिकला नकार देऊया, स्वच्छ कापडी पिशवीचा स्विकार करून प्लास्टिकमुक्त नवी मुंबईच्या निश्चयामध्ये सामील व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदर प्रसंगी राजेश पाटील व काशिनाथ पाटील यांच्या वतीने ताईंचा सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटलसाठी रु. 250 कोटींचा पहीला हप्ता आणल्या बद्दल जाहीर सत्कार ही करण्यात आला. यावेळी आ.म्हात्रे पुढे म्हणाल्या जेव्हा जेव्हा न.मु.म.पा. तर्फे पावसाळी पुर्वी किंवा नंतर गटार नाले साफ केले जातात त्यात सर्वाधिक प्रमाणात प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीकच्या वस्तुच आढळतात तसेच पावसाळ्यात जिथे जिथे पाणी भरते त्या ठिकाणी ही बऱ्याचदा प्लास्टीकमुळेच नाले तुंबलेले आढळतात. त्यामुळे नवी मुंबईकरांनी आता प्लास्टीकच्या पिशव्या वापरणे बंद करावे असे आवाहन केले. आ.म्हात्रे यांनी नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नवी मुंबई प्लास्टीक मुक्त अभियानाअंतर्गत आपल्या गणेश मंडपांशेजारी प्लास्टीक मुक्तीचे प्रबोधनात्मक बॅनर व देखावे उभारावे आणि या चळवळीत सहभागी होण्यासाठी कळकळीची विनंती ही केली आहे. तसेच मागणी करणाऱ्या सर्व गणेश मंडळांना सुंदर आणि टिकाऊ कापडी पिशव्यांचे वाटप ही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai