Breaking News
नवी मुंबई ः इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्याच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आवाहनास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र देऊन सर्वच विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले. 5 व्या दिवशीच्या गणेशमूर्ती विसर्जन प्रसंगी महानगरपालिकेने 22 नैसर्गिक आणि 137 कृत्रिम अशा एकूण 159 विसर्जन स्थळांवर केलेल्या चोख व्यवस्थेत 7940 गणेशमूर्तींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 5902 घरगुती तसेच 113 सार्वजनिक मंडळांच्या 6015 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1914 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 1925 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 7816 घरगुती व 124 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 7940 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 1185 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 159 विसर्जन स्थळांवर 5 दिवसाच्या 7940 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
गणेशोत्सव इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त साजरा करण्याच्या पालिकेच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे निदर्शनास आले. अशा भाविकांना स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र देऊन प्रोत्साहित करण्याचा अभिनव उपक्रम सर्वच विसर्जन स्थळांवर राबविण्यात आला. पाचव्या दिवशीच्या विसर्जनप्रसंगी 1185 शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai