Breaking News
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी
नवी मुंबई ः महानगरपालिकेचे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे पालिकेस शक्य होणार असून पालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार आहे. या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाल्याने ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे. सदर मंजूरीनुसार पीजी मेडीकल सायन्स इन्स्टिटयुटमध्ये पहिल्या टप्प्यात मेडिसीन (3 सीट्स), ऑर्थोपॅडीक 2 सीट्स, गायनॅकोलॉजी (8 सीट्स) व पिडीयाट्रीक (4 सीट्स) अशा 4 शाखा सुरु कऱण्यात येत असून लवकरच सर्जरी याही शाखेला परवानगी प्राप्त होणार आहे. मेडीकल सायन्स इन्स्टिटयुट सुरु करण्यासाठी पालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल.
याव्दारे महापालिका रूग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai