Breaking News
177 दिवासांनी तिहार जेलमधून सूटका; सीबीआयच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मात्र सशर्त जामीन मंजूर झाला असून केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर सही करता येणार नाही. शुक्रवारी सायंकाळी केजरीवआल यांची तिहार जेलमधून सुटका झाली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन अबकारी धोरणात (मद्यधोरण) भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपावरून ईडीनं 21 मार्चला अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने 10 मे रोजी निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांचा जामीन मंजूर केला होता. याच जामिनाचा कालावधी संपल्यानंतर अरविंद केजरीवाल 2 जूनला तुरुंगात परतले होते. मात्र, त्याच दरम्यान अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने 26 जूनला मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ेअटक केली होती. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर सीबीआयच्या अटकेच्या विरोधात केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर 13 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अटीशर्तीच्या अधीन 10 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती भूइंया यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला. मात्र यावेळी सीबीआयने केजरीवालांना केलेली अटक योग्य होती की नाही याबाबत दोन्ही न्यायमूर्तींची मतं वेगवेगळी होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केजरीवालांच्या अटकेचं समर्थन केलं तर न्यायमूर्ती भुइंया यांनी मात्र या अटकेवर काही प्रश्न उपस्थित केले. तसेच सीबीआयने ज्या वेळी ही अटक केली त्या टायमिंगवरही न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेनंतर केजरीवालांचा जामीन मंजूर झालेला असताना तो जामीन रोखण्यासाठी ही अटक केली होती का?
न्यायमूर्ती भुइंया म्हणाले, सीबीआयला सिद्ध करावं लागेल की ते पिंजऱ्यातला पोपट नाहीत. चुकीच्या पद्धतीने कोणालाही अटक होऊ नये यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न त्यांनी करायला हवेत. देशातील नागरिकांच्या मनातील अनेक धारणा संस्थांची प्रतिमा बदलू शकतात, वेगळी प्रतिमा निर्माण करू शकतात. त्यामुळे सीबीआय बंद पिंजऱ्यातील पोपट असल्याचा लोकांचा समज त्यांना दूर करावा लागेल. सीबीआयने सीझरच्या पत्नीप्रमाणे संशयाचा भोवऱ्यातून बाहेर पडायला हवं. न्यायालयाच्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल हे जवळपास 177 दिवसानंतर तुरूंगाच्या बाहेर आले आहेत.
कोणत्या अटींवर जामीन
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai