Breaking News
नवी मुंबई ः अनधिकृत झोपड्यांविरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात कारवाई करण्यात आली.
पालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत येणारे नेरूळ पुर्व येथील भगवान बाबा गार्डन, सेक्टर 9, नेरूळ ग्रीनलॅन्ड अपार्टमेंट जवळ नवी मुंबई महापालिका जल उदंचन केंद्रासमोर भर रस्त्यात पदपथावर अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या आहेत. त्या झोपडपट्टयांमधून अवैध व्यवसाय सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच त्या ठिकाणी रात्री 20 ते 25 लोक फुटपाथवरच झोपत असल्यामुळे सर्वसामान्य महिलांना वाट काढणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरीकांना सदर रहिवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने 19 सप्टेंबर 2024 रोजी ‘बी' विभाग नेरूळ, अतिक्रमण विभागामार्फत सदर ठिकाणावरील अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली असून सामान जप्त करण्यात आले आहे.
सदर मोहीमेअंर्तगत जप्त केलेल्या सामानामध्ये पाच बॅग, सहा पाण्याचे जार, कपडे भरलेले बोचके, दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल, सहा मोठे प्लायवूड, 3 लहान प्लायवूड, पाच बॅनर, छत्तीस बांबू, एक हिरवी जाळी, चार प्लास्टीक खुर्च्या, सहा पुठ्ठा बॉक्स इत्यादींचा समावेश आहे. जप्त्ा केलेले सामान कोपरखैरणे क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आलेले आहे. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai