Breaking News
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यावतीने मोफत सहलीचे आयोजन
नवी मुंबई – नवसाला पावणारी एकविरा देवी आगरी कोळ्यांचे आराध्य दैवत असून हिंदू समाजात एक विशेष स्थान राखते. लोणावळा येथील वेहरगाव कार्ला गडावर वसलेली एकविरा आई अनेकांचे श्रद्धास्थान आहे. या देवीच्या दर्शनासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात, 29 सप्टेंबर 2024 रोजी नवी मुंबईतील महिलांसाठी मोफत सहल आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये हजारो महिलांनी एकविरा आईच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी आमदार म्हात्रे म्हणाल्या, “एकविरा आईच्या दर्शनाने महिलांचे दु:ख दूर होईल आणि त्यांना नवी ऊर्जा मिळेल.” सहलीसाठी कोणतीही जाहिरात न करता, हजारो महिलांनी आपल्याकडे नावनोंदणी केली. यापुढेही टप्प्याटप्प्याने उर्वरित मतदारांना एकविरा आईचे दर्शन घडवणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर, त्यांनी सर्वांना निसर्गाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवून कापडी पिशव्या स्वीकारण्याचे आवाहन केले. “प्लास्टिकमुक्त नवी मुंबईच्या निश्चयामध्ये सहभागी व्हा!” असेही त्यांनी सांगितले.आमदार म्हात्रे यांचा हा उपक्रम नवी मुंबईच्या पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छतेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उपक्रमामुळे नवी मुंबईचा पर्यावरण संरक्षणासाठी एक नवा पाऊल उचलला गेला आहे.
या उपक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत भरत जाधव, मकरंद म्हात्रे, संगीता म्हात्रे, सुमित्रा पवार, जयेश थोरवे, मुकुंद विश्वासरा आणि कुसुम बनसिलाल सेद यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai