Breaking News
माथाडी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
नवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजांचे नेतृत्व केले आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी मुंबईत दिले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाची चळवळ उभी करून अण्णासाहेब पाटील यांची आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. कायद्याच्या चौकटीत बसेल, अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरपट होईल, असेही फडणवीस म्हणाले. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट आहे असेही ते यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यांवर आहेत. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला आहे. मराठा समजाला नोकरीत देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. कोणाचे म्हणणे वेगळे असेल, पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की, मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्वी इतके कार्यरत नव्हते. त्यावेळी नरेंद्र पाटील याना विनंती केली. हे महामंडळ बंद असल्यासारखे आहे, तुम्ही जबाबदारी घ्या, पैशाची कमतरता पडू देणार नाही, असे त्यांना सांगितले. मराठा समाजात उद्योजक निर्माण करण्यासाठी हे सुरु केले होते. खरोखर सांगतो की, जे काम आर्थिक विकास महामंडळात नरेंद्र पाटील यांनी काम करुन दाखवले तसे देशात झाले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातील मागण्या
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai