Breaking News
नवी मुंबईः छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित विवेकानंद संकुल सानपाडा या ठिकाणी संस्था पातळीवरील विज्ञान प्रदर्शनाची प्राथमिक फेरी संपन्न झाली. सदर प्रदर्शनामध्ये छत्रपती शिक्षण मंडळाच्या सुमारे 56 शाळांनी भाग घेतलेला आहे.
अविष्कार या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात विवेकानंद संकुल येथे प्राथमिक फेरीने झाली. 7 जानेवारी 2025 मंगळवार रोजी छत्रपती शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष असलेले विश्वासजी सोनवणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास वाव्हळ सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेश गायकवाड, मुलचंद सोनवणे, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, निवृत्त वैज्ञानिक अगरवाल उपस्थित होते. आजचे विद्याथ उद्याचे वैज्ञानिक असल्याकारणाने त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीला वाव देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे प्रास्ताविकातून सरांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वजीत सोनवणे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले.
अविष्कार कार्यक्रमाच्या प्राथमिक फेरीमध्ये माध्यमिक विद्यालय व प्राथमिक विद्यालय त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक माध्यमिक विद्यालयांचा समावेश होता. प्रदर्शनामध्ये सुमारे 70 प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला होता. सर्व प्रकल्पांचे परीक्षण करून गुणदान केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai