Breaking News
इस्कॉन मंदिर लोकार्पण सोहळा; नवी मुंबई पोलीस सज्ज
पनवेल : खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.15) होणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापासून ते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जाईपर्यंत खारघर येथील टाटा कर्करोग रुग्णालय ते इस्कॉन मंदिर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
खारघरमध्ये सुमारे दोन हजार वाहने दाखल होतील या अंदाजाने पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरते वाहनतळ आणि वाहनतळापर्यंत दिशा दाखविण्यासाठी पाचशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तयार ठेवला असल्याची माहिती नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. याशिवाय नवी मुंबई पोलीसांचा शहर भर आणि कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सोमवारी याच पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.
प्रवेश बंद:
ओवे गाव पोलीस चौकी ते जे. कुमार सर्कल ते ग्रीन हेरिटेज मार्गावर दोन्ही बाजूंनी प्रवेश बंद राहणार आहे. तसेच गुरुद्वारा चौक ते जे. कुमार सर्कल ते बी. डी. सोमाणी शाळेच्या मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांना बंदी आहे. तसेच इस्कॉन मंदिर गेट नं. 1 ते इस्कॉन मंदिर गेट नं. 2 या मार्गावर बंदी असणार आहे. या बंदमध्ये व्हीआयपी वाहने, पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवा, शासकीय वाहने आणि कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांना सवलत दिली आहे.
येथे वाहने उभी करु नये
हिरानंदानी जंक्शन ते उत्सव चौक ते ग्रामविकास भवन ते गुरुद्वारा ते ओवेगाव चौक दोन्ही मार्गिकांवर वाहने उभी करु नये. ओवे गाव पोलीस चौकी ते ओवे क्रिकेट ग्राउंड (हेलीपॅड), ग्रामविकास भवन ते ग्रीन हेरिटेज ते सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन, जे. कुमार सर्कल ते ग्रीन हेरिटेज सकाळी मार्गाच्या दुहेरी बाजूस सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत वाहने उभी करु नयेत.
या मार्गाचा वापर करा
मार्ग क्र. 1: ओवेगाव चौक डावीकडे/उजवीकडे वळून इच्छित स्थळावर.
मार्ग क्र. 2: ग्रामविकास भवन/प्रशांत कॉर्नर/शिल्प चौक/सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकातून इच्छित मार्गांवर वळण.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai