सहवास

तूझ्यासोबत घालवलेले ते एकांताचे क्षण
रातरानीच्या गंधात जसे हरवते मन...
स्पर्श तूझा होताच शहारते अंग
नकळत जसा होतो चंद्र चांदण्यात दंग....
उबदार ती मिठी.. जणू रेशमाचे बंध
फूलपाखरालाही हवा असतो फूलांचाच गंध....
बोलकी ही नजर तूझी आस वेड्या मनाची 
होशील कधी सोबती तू माझ्या जीवनाची?
करपून गेली सारी स्वप्न माझी कोवळी
काही नको मला, 
फक्त हवी तूझ्या सहवासाची सावली....

मोना विलास सणस