हिशोब

मीरा के बोल

आयुष्याचा हिशोब मांडुन बसलो होतो जेव्हा
किती जोडावं अन किती वगळावं समजलं नाही तेव्हा
ज्यांना आपलं मानल ते कधीच दुर गेले होते
जे मागे उरले ते कधीही आपले झाले नव्हते
प्रेम देऊन सर्वाना मी रीता झालो होतो
तरीही प्रेमात मी नेहमीच गंडला गेलो होतो
मैत्रीचे नाते ही मी जिवापलीकडे जपले होते
पण मित्रांच्या त्या मैफिलीत मला कधी बोलावले नव्हते
निस्वार्थ देणं हाच माझा मूळ मंत्र होता
दुर्दैवाने तो कोणालाच कधी उमगला नव्हता
स्वार्थ, द्वेश, मोह माया या पलिकडचे नाते मी जपले होते 
समोरच्याला मात्र ते समजावणे मला कधीच जमले नव्हते
आता मागे वाळून पाहता गणितं सगळीच अवघड झाली
दिलेल्या फुलांपेक्षा कमीच फुलं माझ्या पदरात पडली
आयुष्याच हे कोडं काहीकेल्या कधी सुटणार नाही
पण देताना मी पुन्हा कसलाच विचार करणार नाही

मीरा पितळे