Breaking News
पनवेल गुन्हे शाखेची कामगिरी
पनवेल ः नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करुन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व शाखांना करण्यात आल्या होत्या. यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेल यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन अभिलेखावरील अट्टल गुन्हागारास अटक केली आहे. त्याच्याकडून 2 मोटारसायकल हस्तगत करुन 5 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमाल व 12 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यासह 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नवी मुंबई परिसरात सोनसाखळी चोरीच्या विशेष म्हणजे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेल यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडलेल्या सोनसाखळी चोरीचा तपशील संकलीत केला. त्यावरुन चोरी करताना वापरलेल्या वाहनाचा प्रकार, सीसीटीव्ही फुटेज, चोरीचे ठिकाण, चोरीची वेळ व वार, आरोपीचे वर्णन यांवरुन अभ्यासपुर्ण व कौशल्यपुर्ण तांत्रिक तपास करुन सोनसाखळी चोरी करणारा आरोपी गुन्हे अभिलेख तपासून निष्पन्न केला. वेगवेगळी पथके तयार करुन शोधमोहीम सुरु केली. सहा.पो. आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गणेश कराड, प्रविण फडतरे, पोउपनि वैभव रोंगे व मानसिंग पाटील यांची वेगवेगळी पथके तयार केली. सदर पथकांनी मुंबई, भिंवडी, कल्याण, वर्तकनगर व ठाणे रेल्वे परिसरामध्ये सलग 4 दिवस सापळा लावून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार फजल आयुब कुरेशी, (25), रा, कल्याण याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता सदर गुन्ह्यांची कबूली दिली.
तो सोनसाखळी चोरी करण्याकरिता वापरत असलेल्या 2 मोटारसायकली हस्तगत करुन त्याचेकडून एकूण 5 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह नवी मुंबई व ठाणे आयुक्तायातील 12 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यासह एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai