Breaking News
विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्या मध्ये घडलेल्या मोटार सायकल चोरी, मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्याअंतर्गत मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेकडून दुचाकी मोटार वाहन चोरी व मोबाईल स्नॅचिंग करणार्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून सात मोटार सायकल व सहा मोबाईल फोन असा सुमारे 4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मध्यवती कक्षाचे पोलीस अमंलदार लक्ष्मण कोपरकर व राहुल वाघ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार मोटार सायकल व सहा मोबाईल चोरी करणारे दोन विधीसंघर्ष बालक यांना उलवे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळील दुचाकींविषयी चौकशी केली असता पनवेल शहर येथून त्या चोरी केल्याची कबूली त्यांनी दिली. तसेच पनवेल, पनवेल तालुका, खांदेश्वर, न्हावाशेवा, खारघर, रबाळे, उरण येथून त्यांनी 8 मोटार सायकल चोरी केल्याचीही कबुली दिल्याने त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटार सायकल हस्तगत केल्या. तसेच 95 हजार रुपयांचे 6 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्यांनी उलवे, सानपाडा, खारघर, कळंबोली या परिसरातून स्नॅचिंग केल्याचे सांगितले. मोटारसायकल व मोबाईल असा एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून अधिक तपास सुरु आहे. हे बालअपचारी मोटार सायकल चोरी करुन त्याचा वापर मोबाईल स्नचिंग करीता वापरत असून नंतर त्या मोटार सायकल उलवे येथील बामडोंगरी रेल्वे स्टेशनचे पॉर्किंगमध्ये सोडून देत होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai