Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखंाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याने विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक केली होती. सदर गुटख्याचा साठा त्याने कुठून आणला याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात नशा मुक्ती अभियान राबवले जात असून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे. यादरम्यान सीवूड्स येथील करावे गाव येथे किराणा स्टोअर्स चालविणार्या दुकानदाराने आपल्या घरामध्ये गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक जयराज छापरिया यांनी पोलीस निरीक्षक अश्विनी कुसूरकर, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, हवालदार कासम पिरजादे, इकबाल शेख, महेश शेट्टे, तुकाराम सूर्यवंशी, राजेश सोनावणे, राहुल वाघ, देवमन पवार यांचे पथक केले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी करावे सेक्टर 36 येथील लक्ष्मी किराणा स्टोअर या दुकानावर छापा टाकला. त्यामध्ये दुकानात व दुकानदार राजूराम आसाराम देवासी याच्या घरातून तब्बल 20 लाख 46 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सदर गुटखा जप्त करून देवासी विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूराम देवासी याला अटक करुन त्याला एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai