Breaking News
उरण ः चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड तर्फे उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध लहान वयातील बेंजो वादक म्हणून कु. चित्राक्ष स्वप्निल घरत (वय 6) भेंडखळ, उरण याचा उरण विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील सर्वात कमी वयाचे बेंजो वादक म्हणून उरण तालुक्यात नव्हे तर रायगड, नवी मुंबई, मुंबई येथे या छोट्या बेंजो वादकमध्ये चित्राक्ष घरत याची चर्चा आहे. त्यांने उरण तालुक्याचे नाव उंचावल्यामुळे चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे उरण विशेष सम्मान पुरस्कार देण्यात आला अशी माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांनी दिली. कुमार चित्राक्ष स्वप्निल घरत हा वयाच्या तीसऱ्या वर्षापासून घरात सहज बँड वाजवत होता. त्यातून त्याला आवड निर्माण झाली. त्याची कला पाहून त्याने व्यावसायिक बँडमध्ये वादन केले असता त्याचे वादन सर्वांना आवडले याचाच धागा पकडून मुंबई येथील सुप्रसिद्ध बँजो पथकाने त्याच्या व्हिडिओ आपल्या युट्युब तसेच इंस्टाग्रामला पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्ट प्रसिद्ध होऊन त्याला लाखो लाईक मिळाल्या. आज चीत्राक्ष हा उत्कृष्ट ढोलकी तसेच पखवाज वाजवत आहे. क्लासिकल पखवाजचे शिक्षण तो तुषार घरत यांच्याकडे घेत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai