Breaking News
पनवेल : नवीन पनवेल व कळंबोली अग्निशमन केंद्र सिडकोकडून पनवेल पालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहे. याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा-सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपकरणे महापालिका लवकरच खरेदी करणार आहे.
पनवेल महापालिकेचा जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना महापालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिले जात आहे. याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा-सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपकरणे महापालिका लवकरच खरेदी करणार आहे, असे आयुक्त मंगेश चितळे म्हणाले.
या अग्निशमन केंद्रांच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काचे पनवेल, कळंबोळी, नवीन पनवेल असे 3 अग्निशमन केंद्र मिळाले आहेत. आता नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रांतील प्रत्येकी 2 अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतरण करण्यात आले असून. नुकत्याच झालेल्या भरती दरम्यान महापालिका अग्निशमन विभागात 110 अग्निशमन कर्मचाऱ्यांची भरतीही करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका क्षेत्रातील संभाव्य धोके, नदी, इमारती या सर्वांचा विचार करुन प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai