Breaking News
एका दिवसात 76 चालकांकडून दंड वसूल
पनवेल ः चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईची धडक मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली. चारचाकी गाड्यांच्या बाजूच्या काचा 50 टक्के व मागच्या बाजूची काच 70 टक्के पारदर्शक असावी, असे मोटार वाहन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र सर्रासपणे याहून अधिक काळ्या फिल्मच्या काचा बसविण्यात येत असल्याची बाब वारंवार समोर येत असते. याबाबत चारचाकी गाड्यांच्या काचांना कोणत्याही प्रकारची फिल्म लावू नये, असे न्यायालयाने दिले होते. त्यानुसारच आजपर्यत या वाहनावर कारवाई सुरूच आहे. एका दिवसात धडक मोहीम पनवेल शहरात राबवून, या कारवाईत 76 वाहनांवर कारवाई केली. त्यानुसार त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai