Breaking News
नागरिकांमध्ये संतापाची लाट; शाळा व्यवस्थानाचा अजब प्रताप
उरण ः युईएस शाळेत इयत्ता 2 च्या वर्गात शिकणाऱ्या हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाल्यावर पालकांनी शाळेतून तिचे नाव कमी करण्यात आले. मात्र शाळा प्रशासनाने उर्वरित चार महिन्यांची फि तत्का भरण्यासाठी पालकांना नोटीस बजावली आहे. कुटुंब दुःखातून सावरले नसताना शाळा व्यवस्थापनाच्या या अजब कारभारामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.
उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची 12 पर्यंत शाळा आहे. या शाळेत हनुमान कोळीवाडा येथील रहिवासी भक्तेश म्हात्रे यांच्या आठ वर्षाच्या दोन जुळ्या मुली दुसरीत शिकत होत्या. यापैकी हर्षी हिचे 1 नोव्हेंबर 2022 रोजी अकस्मित निधन झाले. मुलीच्या निधनानंतर पालकांनी वर्ग शिक्षक, शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. मृत्युपत्र सादर करुन हर्षीचे नावही शाळेच्या रजिस्टर मधुन नोव्हेंबर महिन्यातच कमी केले आहे. चिमुकल्या निधनाने पालक दुखातुन अद्यापही सावरलेले नसताही 24 फेब्रुवारी रोजी शाळा व्यवस्थापनाने हर्षीची माहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 6000 रुपये फी तत्काळ भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. शाळेचा हा अजब कारभार पाहून म्हात्रे कुटुंबियांना धक्का बसला आहे. शाळा व्यवस्थापनाच्या या संतापजनक प्रकारामुळे तसेच शाळा व्यवस्थापन अनेकदा पालकांना विश्वासात न घेता विविध निर्णय घेत असल्यामुळे येथील पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आणि संतापजनक आहे. कोरोना काळातही शाळेने शासनाच्या आदेशानंतरही शाळा बंद असतानाही पालकांकडून सक्तीने फी वसूल केली आहे. आता पुन्हा 31 टक्के फी वाढीचा प्रस्ताव आणला आहे. विचारणा करणाऱ्यांना व्यवस्थापनाकडून फी परवडत नसेल तर पाल्यांना म्युनिसिपल शाळेत घाला अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने शाळा व्यवस्थापन कडुन पालकांना त्रास देणे सुरूच आहे. - प्राजक्ता गांगण, युईएस शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा
शाळा व्यवस्थापनाची चुक झाली आहे. फी वसुलीसाठी नोटीस काढणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन माफीही मागितली आहे. - तनसुख जैन, युईएस संस्थेचे अध्यक्ष
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai