Breaking News
पनवेल परिसरातून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपी अटक करण्यात आली आहे. आरोपी कडून बिबट्याची कातडीही जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव प्राणी संरक्षक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 28 फेब्रुवारीला गुन्हेशाखा, कक्ष-2 पनवेल येथे कार्यरत पोलीस हवालदार अनिल पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाका जवळील वैश्णवी हॉटेल जवळ एक इसम दुर्मिळ प्रजातीचे नामशेष होत असलेले संरक्षित वन्यजीव बिबटयाची कातडी अनाधिकृतरीत्या जवळ बाळगुन विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगाने मिळालेल्या बातमीची खातर जमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी एक पोलीस पथक तयार करून पंच, वन विभागाचे अधिकारी व छाप्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह नमूद ठिकाणी रवाना झाले. ज्या ठिकाणी संशयित व्यक्ती येणार होता त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. काही वेळाने एक इसम त्याचे उजव्या खांदयावर बॅग लटकवुन खारपाडा ब्रिज बाजुने खारपाडा टोलनाकाकडे येत असताना दिसला. त्याला पाहताच सोबत असलेल्या बातमीदाराने ठरल्या प्रमाणे इशारा केला. सदरचा इसम हा खारपाडा टोलनाका येथील मुंबई बाजुचे डावेलेनवर आला असता पोलीस पथकाने नमुद इसमाला पळुन जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत आढळून आलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात बिबट्याची कातडी आढळून आली
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai