Breaking News
पनवेल ः रिक्षा मीटर आणि शेअर रिक्षा दोन्हीं तिढा सोडवण्याची जबाबदारी आता आरटीओ, वाहतूक खाते आणि पनवेल महापालिकेच्या खांद्यावर आली आहे. या तिन्ही शासकीय यंत्रणांनी कठोर उपाय राबविण्याचा मानस केला आहे. त्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याची आठवडाभरात अंमलबजावणी सुरु होईल, अशी ग्वाही पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
पनवेल परिसरात रिक्षाचालक आणि प्रवाशी यांच्यात नेहमी मीटर व शेअर असा वाद होतो. काही रिक्षावाले मुजोरपणे भाडे नाकारतात, मीटरप्रमाणे भाडे घेत नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशी करत असतात. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पनवेल संघर्ष समिती अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. आंदोलनाचे हत्यारही उपसले. त्याचाच पाठपुरावा म्हणून नुकतीच आरटीओ, वाहतूक खाते आणि महापालिकेची बैठक संघटनेच्यावतीने पार पडली. प्रवाशांना नरक यातनेतून बाहेर काढा, हे आंदोलन मुजोर रिक्षा चालकांविरोधात आहे. सरसकट रिक्षा चालकांविरोधात नाही. यावर मार्ग काढताना पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर व तळोजे शहरात रिक्षा मीटरप्रमाणे धावतील, मीटरप्रमाणे भाडे न आकारले गेल्यास कारवाई होईल आणि त्यासाठी आरटीओने हेल्पलाईन नंबर घोषित केला आहे. यासंदर्भातील काही सूचनांचे दोन हजार फलक महापालिका क्षेत्रात आठवड्याभरात नाक्यानाक्यावर लावून रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात जनजागृती केली जाईल. त्याची जबाबदारी महापालिकेचे उपस्थित उपायुक्त (मालमत्ता व वाहन) गणेश शेट्ये यांनी घेतली आहे. तर पनवेल पुर्व व पश्चिम भगातील तसेच खारघर, खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर आरटीओ आणि वाहतूक खाते स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाईची सक्तीची मोहीम तातडीने सुरु करुन रिक्षा मीटरची अंमलबजावणी करण्यास सज्ज झाले असल्याचे अनिल पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनावणे आणि वाहतूकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुक्रमे संजय नाळे (पनवेल), हरिभाऊ बाणकर (कळंबोली), योगेश गावडे (खारघर) व सुनील कदम (तळोजे) यांनी सांगितले.
शेअर रिक्षा चालकही मीटरने व्यवसाय करू शकतात, तसा कायदा अस्तित्वात आहे. शहरातील रिक्षा चालकांना मीटरप्रमाणेच भाडे आकारावे लागेल, अशी तंबी देताना अल्पप्रमाणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे अत्यंत क्लिष्टपणे काम करावे लागत आहे. त्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अपघातशून्य प्रवासाची मोठी मोहीम राबवूनही गेल्या महिनाभरात रिक्षा चालकांची दादागिरी मोडून काढताना मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याची माहिती पाटील यांनी दिली.
चर्चेतील महत्वाचे मुद्देः
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai