Breaking News
उरण ः नेरूळ-उरण उरण येथे नव्याने रेल्वे सेवा सुरु होत आहे. येथील रेल्वे स्टेशनला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी ही नावे देण्यात आली आहेत. मात्र रेल्वे स्थानकास तेथील महसुली गावाचे नाव देणे क्रमप्राप्त असतानाही रेल्वे प्रशासनाकडून जे तेथे गांव अस्तित्वात नाही अशी नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित रेल्वेस्थानकांना स्थानिक महसुली गावांची नावे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या नावांना संबंधित ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यासाठी आंदोलनही करण्यात आले आहे. रांजनपाडा ऐवजी धुतुम, न्हावा शेवा रेल्वे स्थानकास नवघर तर द्रोणागिरी रेल्वे स्थानकास बोकडविरा रेल्वे स्थानक हे नाव देण्यात यावे ही मागणी जोर धरुन लागली आहे. या रास्त मागणीचा रेल्वे मंत्रालयाने सहानुभूतीने विचार करावा व वरील रेल्वे स्थानकांचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, आमदार महेश बालदी,रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली आहे. रेल्वे स्टेशनला महसूली गावांची नाव देण्याबाबत उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनीही विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी जनतेची महत्वाची समस्या लक्षात घेउन महसूली गावांची नावे त्या त्या रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी महत्वाची मागणी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai