दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 07, 2024
- 63
उरण ः मागील तीन वर्षापासून दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्यातर्फे 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. याही वष 3 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी मल्टीपर्पज हॉल जेएनपीटी उरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी संपूर्ण उरण तालुक्यातील दिव्यांग बांधव एकत्र जमून दिव्यांग दिन साजरा करतात. उठ अपंगा जागा हो आपल्या हक्काचा तू धागा हो हा संदेश देणारे दिव्यांगांचे माऊली कै. महादेव पाटील यांच्या पावलांवर पाऊल टाकत दिव्यांग सामाजिक संस्था उरण कार्य करत आहे. दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी या संस्थेच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर दिनाच्या दिवशी दिव्यांगाना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक दिव्यांग मित्र मनोहर शेठ भोईर माजी आमदार, प्रीतम म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष नेते, प्रमुख उपस्थिती साईनाथ पवार राज्य दिव्यांग सल्लागार मंडल दिव्यांग मंत्रालय मुंबई आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आणि दिव्यांगाना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सीमाताई घरत यांनी दिव्यांगांना मिळणारी पेन्शन ही अतिशय कमी असल्याने ते वाढविण्याकरिता शासनाकडे मागणी केली,मनोहर शेठ भोईर यांच्याकडून दिव्यांग सामाजिक संस्थेला सहा लाखाची देणगी,याच संस्थेच्या पाठपुराने ओनजीसी कडून राशन किट किट,उडान एनजीओ मार्फत वॉटर करण्यात आले.
प्रीतम म्हात्रे यांनी दिव्यांगाना उरण तालुक्यात दिव्यांगा करिता स्वयंरोजगारसाठी सिडको मधून भूखंड मंजूर करून देण्याकरिता मदत करण्याची आश्वासन दिले.साईनाथ पवार यांनी दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या योजनांबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरता उडान फाउंडेशन तर्फे दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा आणि मल्लखांब यांचे नयनरम्य असे सादरीकरण करत आलेल्या दिव्यांग बांधवांचे मनोरंजन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai