Breaking News
उरण : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने सोमवारी दोन दिवस अगोदरच उरण नगरपरिषदेच्या जलरणतलावात पाण्याखाली नौदलाचे निवृत्त कमांडो रवी कुलकर्णी यांनी पत्नी विदुला कुलकर्णी यांच्यासह 13 फूट खोल तलावात 22 मिनिटांत वेगवेगळ्या प्रकारची 12 आसने केली. या अनोखी उपक्रमात आनंद आल्याची माहिती विदुला यांनी दिली, तसेच प्रथमच पाण्याखाली योगा करण्याचा प्रयत्न केल्याचे ही त्यांनी सांगितले.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पाण्याखाली ध्वजारोहण व परेड करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता. त्याच जलतरण तलावात योगदिनानिमित्त योग प्रात्यक्षिके यशस्वीपणे करण्यात आली. कुलकर्णी दाम्पत्यांनी 22 मिनिटांत उभ्याने पर्वतासन, त्रिकोणासन, वीर भद्रासन, नटराजासन व देव मुद्रा तर बैठक स्थितीत पर्वतासन, सिहासन, भुजंगासन, सुलभासन, पद्मासन केली. त्याचबरोबरीने श्लोक आणि ओंकार करण्यात आल्याची माहीती रवी कुलकर्णी यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai