औद्योगिक वसाहतीवर पाण्याचे भिषण संकट
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 23, 2023
- 183
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीवर पाण्याचे भिषण संकट ओढावले आहे. त्यामुळे उद्योजक मेटाकुटीला आले असून पाण्याविना उद्योग कसे चालवायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उद्योजकांच्या संघटनेमधील 25 कारखानदारांनी सोमवारी तळोजा एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून आपली व्यथा मांडली. उद्योजकांच्या पवित्र्यानंतर एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत उद्योजकांची संयुक्त बैठक मंगळवारी आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना 53 दश लक्ष लीटर पाणी लागते. हा पाणी पुरवठा बारवी धरणातून केला जातो. मागील दोन वर्षांपासून उद्योजकांना पाणी पुरवठा सूरळीत होता. परंतू 53 दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना अवघे 38 एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करावा लागतो. या सर्व स्थितीमुळे मोठ्या आणि लघु उद्योगांचे हाल झाल्याची माहिती उद्योजकांची संघटना टीएमएचे खजिनदार दिलीप परुळेकर यांनी दिली.
तसेच टीएमएच्या उपाध्यक्षा आणि दीपक फर्टीलायझर्स कंपनी समुहाच्या वरिष्ठ अधिकारी जयश्री काटकर यांनीही एमआयडीसी अधिकाऱ्यांना सरकारचे उद्योग स्नेही धोरण असताना तळोजातील उद्योगांना पाण्यासारखी पायाभूत सुविधा का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला. टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांनी यापूर्वी बारवी धरणातून तळोजाला व्यवस्थित पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी धरणातील 53 एमएलडी पाण्याचा साठा आरक्षित होते. मात्र उद्योगांचे पाणी इतर ठिकाणी का फीरवले. त्यामुळे उद्योग पाण्याविना अशी स्थिती निर्माण झाली. पाणी टँकरने खरेदी करुन उद्योग चालविणे अव्यवहार्य असून यामुळे उद्योग बंद पडतील, या स्थितीत सरकारचे विविध कर आणि कामगारांचे पगार उद्योजक कसे भरु शकतील, अशी उद्योजकांची बाजू मांडली. दिड ते दोन हजार रुपयांना पाण्याचा एक टँकर खरेदी करुन उद्योग चालविणे कठीण झाले असून एमआयडीसी पाणी नाही देऊ नसेल तर उद्योग बंद केलेले बरे. टँकरच्या पाण्यावर किती दिवस राहायचे असा संतापजनक प्रश्न उद्योजकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai