Breaking News
उरण ः उरण नगरपरिषदचे मॉसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयातील अभ्यासिकेमध्ये नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना सहज आपल्याला उत्तम प्रकारे समजलेला विषय ईतर विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा उपक्रम सुरू केले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ग्रंथपाल संतोष पवार यांनी केले.
या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडत असलेला विषय एक ते दोन तास शिकवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे दर रविवारी एका विषयावर आधारित 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी हि देखील त्या त्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्याचीही सुरुवात 2 जुलै रोजी पहिली गणित विषयाची पहिली चाचणी लेखी परिक्षा घेण्यात आली. व्याख्यान देण्याचा पहिला मान तसेच पहिल्या चाचणी परिक्षेचा पेपर काढण्याचा मान अगदी ह्या उपक्रमाची सुरुवात करण्याचा मान कु. सलोनी विलास कडू-सोनारी उरण हिला मिळाला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपले विषय आपापसात विभागून घेतले आणि अभ्यासिकेमध्ये अधिक प्रोत्साहनवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. या विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परिक्षा द्यावयाच्या आहेत त्यांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये येणे शक्य होत नाही त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळा महाविद्यालयात त्या-त्या ठिकाणी सदर उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही ग्रंथपाल संतोष पवार यांनी याप्रसंगी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai