Breaking News
उरण : पहिल्या जोरदार पावसात येणाऱ्या चिवणी या काटेरी माशांचे प्रमाण घटल्याने त्यांचे दर कडाडले आहेत. एकूण सहा नगांचा दर 500 रुपये म्हणजे एका नगाचे दर जवळपास शंभर रुपयांवर पोहोचले आहे. पावसाच्या सुरुवातीला येणाऱ्या मासळीला उधवन म्हटले जाते. (उधवन म्हणजे समुद्रपार करून खाडीत प्रवेश करणारे मासे) या पहिल्या माशांचा आस्वाद घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते.
पाऊस लांबल्याने या माशांचे आगमनही उशिरा झाले आहे. त्यातच विकासाच्या नावाने उरणमधील अनेक खाड्यांची मुखे बुजविण्यात आली आहेत. किंवा ती वळविल्याने माशांच्या प्रमाणात घट झाली आहे. तर दुसरीकडे इतर मार्ग बंद असल्याने मोकळ्या असलेल्या बेलपाडा खाडीत बुधवारी एकाच वेळी हजारोंच्या संख्येने चिवणी मासा आला होता.
चिवणी हा काटेरी मासा असून पावसाळ्यात अंड्यासह मिळणारा हा मासा म्हणजे किनारपट्टीवरील खवय्यासाठी मेजवानीच असते. त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने मिळत असल्याने त्याचा सर्वचजण आस्वाद घेतात. मात्र यावर्षी उशिराने आलेल्या या माशांच्या दराने उचांक गाठला असल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai