Breaking News
सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्याधिकारी इंगळे यांचे आश्वासन
उरण ः उरण शहरातील विविध समस्या विषयी मनसेच्या शिष्टमंडळांने उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उरणकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. सदर समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
उरण शहरात अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने संदेश भाई ठाकुर-रायगड-जिल्हा अध्यक्ष मनसे यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय भोरे उरण शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेवून समस्यांचे निराकरण करण्याविषयी निवेदन दिले. यामध्ये उरण-मोरा रोड रस्त्यामधील लाईटचे पोल व त्या रस्त्यालगत असलेले गटारे यांचे लवकरात लवकर काम करण्यात यावे, बोरी, कुंभारवाडा, मोरा रोड राहिलेली (गटारे) नालेसफाई करण्यात यावी, विमला तलाव शुशोभीकरण व तळ्यातील गाळ काढण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबाबत व गटारे यांच्यामधील असलेली पाण्याची लाईन स्थलांतरीत करण्यात यावेत असे विविध मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आले. मनसेच्या निवेदनाची व मागणीची दखल घेत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सदर समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उरण शहर सचिव दिनेश हळदणकर, महिला उपतालुका अध्यक्ष कविता म्हात्रे, उरण शहर संघटक गणेश तांडेल,उरण शहर उपाध्यक्ष उमेश वैवडे, उरण शहर उपाध्यक्ष हितेश साळुंखे, उरण शहर अध्यक्ष (म.न.वि.से) प्रतिक अमृते, विभाग अध्यक्ष दत्ता पाटील, सुरेश अय्यर (अण्णा), राजेश सरफरे व ओम शेरे आदी मनसेचे पदाधिकारी, मनसैनिक पस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai