Breaking News
उरण ः वाको इंडिया नॅशनल किकबॉक्सिंग सिनियर अँड मास्टर चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालिंदर पंजाब येथे 1 ते 5 जुलै रोजी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र शुभम परशुराम म्हात्रे याने महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करताना किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये किक लाईट या इव्हेंट मध्ये व -69 या वजन प्रकारामध्ये सुवर्ण पदक व टीम पॉईंट फाईट या प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले.
शुभम दोन सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेसाठी त्याला ग्रामपंचायत मधून व गावातील महात्मा फुले सामाजिक मंडळ जासई चे अध्यक्ष व लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचे पुत्र अतुल पाटील यांनी व अविनाश पाटील यांनी यांनी आर्थिक मदत केली. तसेच या स्पर्धासाठी कोच महाराष्ट्र वाको किकबॉक्सिंगचे अध्यक्ष निलेश शेलार, युथ अकॅडमी अध्यक्ष संतोष मोकल, जीवन ढकवाल, नंदकुमार मोकल, मिलन जाधव, महेंद्र कोळी, शैलेश ठाकूर तसेच मार्गदर्शन म्हणून रायगड किकबॉक्सिंगचे अध्यक्ष सुधाकर घारे (कर्जत) व रायगड किकबॉक्सिंग सेक्रेटरी दीपेश सोळंकी याचे सहकार्य लाभले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai