Breaking News
उरण : कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत 16 जुलै रोजी सवणें आदिवासी वाडी तालुका पनवेल येथे जातीचे दाखले काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 140 आदिवासी बांधवांनी जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरले.
कातकरी उत्थान योजना अंतर्गत कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव मॅडम, तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी मित्र मंडळ, परिवर्तन सामाजिक संस्था आणि उरण सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व आदिवासी बांधवांना आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळेचा दाखला, घरातील कोणत्याही व्यक्तीचा जातीचा दाखला, मतदानाचे कार्ड, सात बारा उतारा, जन्माचा दाखला, बँक खाते बुक इत्यादी कागद पत्रांच्या झेरॉक्स घेवून येण्यास सांगितले होते. ह्या कॅम्पसाठी विशेष मेहनत भगवान देशमुख यांनी घेतली. ादिवासी विकास निरीक्षक पांढरे सर यांनी सर्व फॉर्म्स चेक करून त्यावर शिक्कामोर्तब केला. उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी, दत्ता गोंधळी व नामदेव ठाकूर यांनी सर्व फॉर्म्स भरण्यासाठी मदत केली. परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर घरत यांनी सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थित पणे नियोजन केले. वाडी वरील राघो वाघ आणि सुशिक्षित आदिवासी मुलांनी फॉर्म्स भरण्यासाठी मदत केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai