Breaking News
उरण : खोपटा गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी 13 जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. चाव्यांनी जखमी झालेल्या इसमांना उपचारासाठी येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खोपट्यातील रहिवासी दहशतीखाली वावरत आहेत.
तालुक्यातील खोपटा गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रचंड दहशत माजवली आहे. एकाच दिवशी नऊ जणांचे चावा घेऊन लचके तोडले आहेत. सहा जखमींवर येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कालेल यांनी दिली. उर्वरित सात रुग्णांवर खासगी रुग्णालयात अथवा घरच्या घरी उपचार करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवाशांना घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्या इसमांनी त्वरित उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai