Breaking News
उरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी 6 कोटी 60 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या विविध विकास कामांचे भूमिपूजन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दुर्गम बोरखार गावासाठी अनेक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे धाकटीजुई तसेच विंधणे व टाकी गावातील काही भागात ही कामे करण्यात येणार आहेत. यावेळी या मतदारसंघाचा लोकसेवक म्हणून मला अभिमान वाटत असल्याचे मत उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले.
राज्य सरकारच्या माध्यमातून विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विंधणे ते बोरखार मार्गाचे डांबरीकरण करणे 4 कोटी 50 लाख रुपये, विंधणे ते खालचा पाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे 40 लाख रुपये, बोरखार येथील रंगमंच सुशोभित करणे 20 लाख रुपये, बोरकर येथील सभामंडप बांधणे 15 लाख रुपये, बोरखार येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये, टाकीगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये, टाकीगाव येथे स्मशानभूमी बांधणे 10 लाख रुपये, धाकटी जुई येथे सभामंडप बांधणे 10 लाख रुपये,धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये, खा.पाडा विंधणे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये, विंधणे येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व पथदिवे 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, जेष्ठ नेते अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, विंधणे सरपंच निसर्गा रोशन डाकी, बांधपाडा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर,उरण पंचायत समिती सदस्य दिक्षा प्रसाद पाटील, उद्योगपती संदिप पाटील, सामाजिक कार्यकर्ते समिर मढवी, कामगार नेते जितेंद्र घरत,बोरखार ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष तेजश डाकी व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai