Breaking News
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
उरण ः आगामी दहिहंडी उत्सव, गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे अनुषंगाने उरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील सार्वजनिक दहिहंडी, गणेशोत्सव सण शांततेत, कायदा सुव्यवस्थेचेे भान ठेवून उत्साहात साजरे करण्याचे आवाहन उरण पोलीस प्रशासनाने केले आहे.
दहीहंडी पथक, गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच, सागरी सुरक्षा रक्षक दल यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस प्रशासनाने सणांच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना केल्या. तेरापंथी हॉल उरण येथे आयोजित केलेल्या बैठकीत विविध विभागातील शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकानुसार उपस्थितांना मार्गदर्शन केले व विविध सूचना दिल्या. बैठकीमध्ये उपस्थितांच्या अडी-अडचणी समजावून घेवून त्यांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्या मार्फत निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सदर बैठकीस सुर्यकांत कांबळे पोलीस निरीक्षक(गुन्हे), मधुकर भटे पोलीस निरीक्षक उरण वाहतुक, झुंबर माने नगर अभियंता उरण नगरपरिषद, विजय सोनवळे कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी कार्यालय उरण, यज्ञेश म्हात्रे सहाय्यक कार्यकारी अभियंता सिडको, विजय गोसावी अग्निशमन यांच्यासह शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी सदस्य, दहिहंडी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, महिला दक्षता कमिटी सदस्य, सागरी सुरक्षा रक्षक दल, पत्रकार असे 125 ते 150 नागरिक उपस्थित होते. सदरची बैठक शांततेत पार पडली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai