Breaking News
उरण : जागतिक प्रदूषणाची नोंद करणाऱ्या संस्थेने केलेल्या निरीक्षणातून गुरुवारी सकाळी उरण हे हवेतील धुळीकणाच्या कक्षेत देशातील शहरांच्या पहिल्या क्रमांकावर आला आहे. बुधवारी असलेला हवेचा निर्देशांक (ए क्यू आय) 103 वाढून 196 वर पोहचला आहे. मार्च 2022 मध्ये हा क्रमांक दुसरा होता. यात वाढ झाली आहे. त्यामुळे उरणकारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
10 फेब्रुवारी 2022 मध्ये उरण येथील प्रदूषणाची नोंद ही जागतिक स्तरावर 7 व्या क्रमांकावर आणि देशात 4 था स्थानावर करण्यात आली होती. यामुळे पर्यावरणवाद्यांनी त्यावेळी चिंता व्यक्त केली होती. नॅट कनेक्ट फाऊंडेशनमार्फत करण्यात आलेल्या सुचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पर्यावरण आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाला याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.
या वातावरणातील हवेची नोंद करणाऱ्या संस्थेमार्फत गुरुवारी सकाळी उरण येथील प्रदूषणाची मोजणीची नोंद 196 ए क्यू आय करण्यात आली आहे. ज्यामुळे, हवेत धूळ असल्याचे समोर आले आहे. श्वसनाचे आजार असलेल्या व सामान्य नागरिकांना मुखपट्टी(मास्क)लावण्याची सूचना करण्यात आली आहे. उरण पाठोपाठ बेगूसराय दुसऱ्या आणि टूटुकोरीन तिसऱ्या स्थानावर आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai