Breaking News
उरण ः कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मास्टर्स ऍकव्याटिक स्विमर्स असोसिएशन तर्फे आयोजित जलतरण स्पर्धेत मामी महाराज (परमपुज्य श्री ठाकुर महाराज यांच्या पत्नी कल्पना मधुकर ठाकूर) यांनी प्रौढांच्या राज्य व जिल्हा संघटनेतर्फे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यांनी फ्री स्टाइल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, रीले अशा अनेक स्पर्धांन मधून त्यांच्या वयाच्या 78 व्या वर्षी 2 गोल्ड व 2 सिल्वर पदके पटकावली आहेत. सदर स्पर्धेत 22 जिल्ह्यातील एकूण 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्यांना एलआयसीचे मार्केटिंग व्यवस्थापक प्रताप नलवडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, डॉ. उद्धव पाटील, अनिल निकम, डॉ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी संघटनेचे एन. एस. कुलकर्णी, आर. ए. हिरकुडे, चंद्रकांत मगदूम, शैलेश प्रभू, विलास चौगुले, ऍड.अर्जुन पाटील, पांडुरंग काटकर उपस्थित होते. मुख्य पंच मानसिंग पाटील यांच्यासह सहकाऱ्यांच सत्कार झाला. पुणे संघाने सर्वाधिक मेडल मिळवून विजेतेपद पटकाविले त्यामुळे राज्य संघटनेतर्फे पुणे संघाला गौरवण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai