Breaking News
उरण ः निपुण भारत अभियाना अंतर्गत माता पालक संघाच्या होणा-या शैक्षणिक सभात महिला भगिनींना बसण्याची सोय व्हावी म्हणून वी क्लब ऑफ वुमन द्रोणागिरी आणि तृप्ती सुधीर सुर्वे फाऊंडेशन उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने डाऊर नगर शाळेस नुकताच 50 खुर्च्याची भेट देण्यात आली. यावेळेस वी क्लबच्या अध्यक्षा श्लोक पाटील, खजिनदार आरती ढोले, स्वर्गीय तृप्ती सुर्वे फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना सुर्वे,नम्रता पाटील, शुभांगी शिंदे मुख्याध्यापक श्रीकांत माने, शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळेस मान्यवरांचे तंबाखू विरोधी चळवळीवर अधारीत असणारे मच्छिंद्र म्हात्रे यांनी लिहिलेले जागर तंबाखूमूक्तीचा हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्यदिग्दर्शक किशोर पाटील यांनी केले. सदर खुर्च्यां डाऊर नगर शाळेस मिळवण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिक कैलास भोईर यांनी विशेष प्रयत्न केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai