Breaking News
मेरिटाईम बोर्डाकडून प्रस्ताव तयार
उरण : पिरवाडीला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मेरिटाईम बोर्डाकडून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी या किनाऱ्याचे सुशोभीकरण करून त्याला नवीन साज चढविला जाणार आहे. हा उरणचा रत्नहार पर्यटकांसाठी सजविला जाणार असल्याने पर्यटकांना आकर्षित करून उरणच्या पर्यटन व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मांदियाळी भरते. उन्हामुळे होणारी अंगाची काहिली शमविण्यासाठी तसेच शुद्ध हवेसाठी पर्यटक समुद्रात डुंबण्याचा तसेच लाटांचा आनंद घेत आहेत. उरण मधील पिरवाडी हा तसा छोटासा किनारा आहे. मात्र तरीही या किनारपट्टीवर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. या परिसरात मुंबईच्या धर्तीवर उच्च दर्जाच्या राहण्या खाण्याच्या सुविधा म्हणून हॉटेल्स उभे राहिले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्याप्रमाणे समुद्री पर्यटनासाठी पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. याचा परिणाम आपोआपच पर्यटन आणि इथल्या व्यवसाय वाढीवर होऊ लागला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai